Ad will apear here
Next
‘पी. एन. जी अँड सन्स’तर्फे झरोका ज्वेलरी सादर
पुणे : आधुनिक स्थापत्यशैलीत लोप पावलेल्या व भारतीय ठेवा असणाऱ्या ‘झरोक्या’ला पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.ने दागिन्यांच्या नव्या कलेक्शनचा अविभाज्य अंग बनविला असून, आकर्षक झरोका कलेक्शन सादर केले आहे. पु. ना.गाडगीळ आणि सन्सच्या पुण्यासह महाराष्ट्रातील सर्व दालनांमध्ये हे कलेक्शन उपलब्ध आहे. onlinepng.com वरही याची ऑनलाइन खरेदीसाठी करता येणार आहे.

अजित गाडगीळ
पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.चे अध्यक्ष-संचालक, अजित गाडगीळ म्हणाले, ‘झरोका कलेक्शन आपल्या ऐतिहासिक ठेव्याचे प्रतीक आहे. पूर्वी स्त्रियांसाठी ‘झरोका’ महत्वाचा घटक होता. कारण यातूनच त्या बाहेरील विश्वात सुरू असलेल्या घटनांची अनुभूती घेत होत्या. स्त्रियांसाठी भावनीक नाते असलेल्या या ‘झरोक्या’ला आम्ही दागिन्यांच्या रचनेमध्ये स्थान दिले आहे.’

‘या झरोका कलेक्शनमध्ये पेडंटस् आणि टॉप्सची १८ डिझाइन्स आहेत. विविध प्रकारचे खडे व स्वारोस्की, क्रिस्टल मोत्यांचा वापर यात केला असल्याने याची सुंदरता खुलली आहे. लाइट वेट असणारे झरोका कलेक्शन पारंपरिक व मॉडर्न शैलीच्या कपड्यांवर परिधान करता येऊ शकते. या कलेक्शनमध्ये आणखी दागिने या वर्षी सादर करण्यात येतील,’ असे पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.चे संचालक-सीईओ अमित मोडक यांनी सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZNACB
Similar Posts
चढ्या दराचे सोनेखरेदीवर सावट पुणे : ‘गुंतवणुकीच्या विविध पर्यायांमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याला आपल्याकडे प्राधान्य दिले जाते. यात व्यावहारिक दृष्टिकोनापेक्षा परंपरेचा पगडा अधिक आहे. त्यामुळे सोनेखरेदीसाठी शुभमुहूर्तालाही विशेष महत्त्व असते. अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशीही आवर्जून सोनेखरेदी केली जाते
दागिन्यांच्या घडणावळीवर शंभर टक्के सवलत पुणे : दागिन्यांच्या घडणावळीवर शंभर टक्के मजुरी माफ असल्यास दागिने खरेदीचा आनंद नक्कीच द्विगुणीत होतो. त्यामुळेच पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.ने सोने-चांदी व हिऱ्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर शंभर टक्के सवलतीची ‘अँड १००%’ योजना सुरू केली आहे. कंपनीच्या सर्व दालनांमध्ये ही योजना उपलब्ध आहे.
‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’तर्फे अक्षय्य तृतीयेसाठी विशेष कलेक्शन पुणे : सोन्याला आपल्याकडे समृद्धी समजले जाते आणि साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय्य तृतीया ही सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी सर्वोत्तम समजण्यात येते. त्यामुळेच अक्षय्य तृतीया व आगामी लग्नसराई लक्षात घेऊन पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेडने दाक्षिणात्य शैलीवर आधारित दागिन्यांचे विशेष कलेक्शन बाजारात आणले आहे
‘पीएनजी’तर्फे अक्षय्य तृतीयेसाठी विशेष कलेक्शन पुणे : सोन्याला आपल्याकडे समृद्धी म्हणून समजले जाते आणि साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय्य तृतीया ही सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी सर्वोत्तम समजण्यात येते. त्यामुळेच अक्षय्य तृतीया व आगामी लग्नसराई लक्षात घेऊन पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेडने दाक्षिणात्य शैलीवर आधारित दागिन्यांचे विशेष कलेक्शन बाजारात आणले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language